Site icon Ajinkya Innovations

Phra 1993 कलम ३४ : लेखे व लेखापरिक्षा :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ३४ :
लेखे व लेखापरिक्षा :
१) आयोग, यथोचित लेखे व इतर संबद्ध अभिलेख ठेवील आणि केंद्र सरकार, भारताचे नियंत्रक व महा लेखापरिक्षक यांच्याशी विचारविनिमय करुन विहित करील अशा नमुन्यात वार्षिक विवरण तयार करील.
२) नियंत्रक व महा लेखापरिक्षक, त्याच्याकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालांतराने आयोगाच्या लेख्याची लेखापरिक्षा करील आणि अशा लेख्याच्या लेखापरिक्षेसाठी होणारा कोणताही खर्च आयोगाकडून, नियंत्रक व महा लेखापरिक्षक यांना देय राहील.
३) नियंत्रक व महा लेखापरीक्षक आणि आयोगाच्या लेख्यांची लेखापरीक्षा करण्यासंबंधात या अधिनियमान्वये त्याच्याकडून नियुक्त करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती यांना, नियंत्रक व महा लेखापरीक्षक यांना शासकीय लेख्यांची लेखापरीक्षा करण्यासंबंधात सामान्यत: जे अधिकार, विशेषाधिकार व प्राधिकार असतात तेच अधिकार, विशेषाधिकार व प्राधिकार अशा लेखापरीक्षेसंबंधात असतील आणि विशेषत: वह्या, लेखे संबद्ध प्रमाणके व अन्य दस्तऐवज व कागदपत्रे सादर करण्यास सांगण्याचा व आयोगाच्या कोणत्याही कार्यालयाचे निरीक्षण करण्याचा त्यांना हक्क असेल.
४) नियंत्रक व महा लेखापरीक्षक किंवा त्याच्यावतीने नियुक्त करण्यात येईल अशी अन्य व्यक्ती यांनी प्रमाणित केलेले आयोगाचे लेखे, त्यावरील लेखापरीक्षा अहवालासह प्रत्येक वर्षी आयोगाकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येतील आणि केंद्र सरकार ते प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करील.

Exit mobile version