मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ४३ :
निरसन आणि व्यावृत्ती :
१) मानवी हक्क संरक्षण अध्यादेश, १९९३ ( १९९३ चा अध्यादेश ३०) हा याद्वारे करण्यात येत आहे.
२) असे निरसन झाले असले तरीही, उक्त अध्यादेशान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही कारवाई, या अधिनियमाच्या तत्सम उपबंधान्वये केल्याचे किंवा कारवाई केल्याचे मानण्यात येईल.