मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ४१ :
राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
१) राज्य शासनाला, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, अधिसूचनेद्वारे नियम करता येतील.
२) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेस बाध न येता, अशा नियमांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी उपबंध करता येतील :-
(a)क)(अ) कलम २६ अन्वये १.(सभाध्यक्ष व सदस्यांची) वेतने व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती,
(b)ख)(ब) कलम २७, पोटकलम (३) अन्वये, राज्य आयोगाकडून इतर प्रशासकीय, तांत्रिक वैज्ञानिक कर्मचारी वर्ग ज्याच्या अधीनतेने नियुक्त करण्यात येईल त्या अटी आणि अधिकारी व कर्मचारी वर्गाची वेतने व भत्ते ;
(c)ग)(क) कलम ३५, पोटकलम (१) अन्वये ज्या नमुन्यात लेख्यांची वार्षिक विवरणे तयार करावयाची तो नमुना.
३) राज्य शासनाने, या कलमाच्या अधीनतेने केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर, जेथे राज्य विधानमंडळ दोन सभागृहांचे असेल तेथे त्या विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे, किंवा असे विधानमंडळ एका सभागृहाचे असेल तेथे त्या सभागृहापुढे ठेवण्यात येईल.
——–
१. २००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १९ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.