मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम २४ :
१.(राज्य आयोगाच्या सभाध्यक्ष व सदस्यांचा पदावधी :
१) ज्या व्यक्तीची सभाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असेल, ती ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून २.(तीन वर्षे) किंवा तिच्या वयाला सत्तर वर्षे पूर्ण होतील तो दिनांक, यापैकी जे आगोदरचे असेल तेवढ्या कालावधीपर्यंत आपले पद धारण करील ३.(आणि ती पुन:नियुक्ति साठी पात्र असेल).
२) ज्या व्यक्तीची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असेल ती ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून २.(तीन वर्षांच्या) कालावधीसाठी पद धारण करील आणि तसेच ४.(***) पुनर्नियुक्तीस ती पात्र राहील :
परंतु, कोणताही सदस्य त्याच्या वयाला सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर पद धारण करणार नाही.
३) सभाध्यक्षाला किंवा सदस्याला, त्याचे पद धारण करण्याचे संपुष्टात आल्यानंतर राज्य शासन किंवा केंद्र सरकार यांच्या नियंत्रणाखाली पुढील नियुक्तीस पात्र असणार नाही.)
——–
१. २००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १५ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक १९ याच्या कलम ६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक १९ याच्या कलम ६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक १९ याच्या कलम ६ अन्वये वगळण्यात आले.