Phra 1993 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
(१९९४ चा अधिनियम क्रमांक १०)
प्रस्तावना :
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
मानवी हक्कांचे अधिक चांगल्या रीतीने संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्यांमध्ये राज्य मानवी हक्क आयोग व मानवी हक्क न्यायालये घटित करण्याकरिता आणि त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक अशा बाबींकरिता उपबंध करण्यासाठी अधिनियम.
भारतीय प्रजासत्ताकाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येवो :-
————
१) या अधिनियमास मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ असे म्हणावे.
२) त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे :
१.(***)
३) तो दिनांक २८ सप्टेंबर, १९९३ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३४ याच्या कलम ९५ आणि अनुसूची ५ अन्वये परंतुक (३१-१०-२०१९ पासून) वगळण्यात आले.

Leave a Reply