इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम ७ :
कलम ४ चे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
कलम ४ च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यास एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकेल आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची आणि पाच लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होऊ शकेल.