PDPP Act 1984 कलम ४ : सार्वजनिक संपत्तीस आग किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे हानी पोहोचवणारी आगळीक :

PDPP Act 1984
कलम ४ :
सार्वजनिक संपत्तीस आग किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे हानी पोहोचवणारी आगळीक :
जो कोणी, आग किंवा स्फोटक पदार्थ यांच्या वापराद्वारे कलम ३ च्या पोटकलम (१) किंवा (२) खालील अपराध करील, त्यास एका वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल :
परंतु, न्यायालय, न्यायनिर्णयात नमूद करण्यात येतील अशा विशेष कारणांसाठी एका वर्षाहून कमी मुदतीच्या कारावासाची शिक्षा देऊ शकेल.

Leave a Reply