PDPP Act 1984
कलम ३ :
सार्वजनिक संपत्तीच्या हानीस कारणीभूत ठरणारी आगळीक :
(१) जी कोणी, पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या स्वरूपातील सार्वजनिक संपत्तीव्यतिरिक्त, इतर कोणत्याही सार्वजनिक संपत्तीच्या बाबतीत, कोणतीही कृती करून आगळीक करील, त्यास पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची व द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
(२) जो कोणी, –
(क) जल, प्रकाश, वीज किंवा ऊर्जा यांचे उत्पादन, वितरण किंवा पुरवठा यांच्याशी संबंधित एखादी इमारत, प्रतिष्ठापन किंवा इतर संपत्ती;
(ख) तेल प्रतिष्ठापन;
(ग) कोणतेही गटार, मलप्रणाल;
(घ) कोणतीही खाण किंवा कारखाना;
(ड) कोणत्याही सार्वजनिक पहिवहनाची किंवा दूरसंचारणाची साधने किंवा त्यांच्याशी संबंधित उपयोगात येणारी एखादी इमारत, प्रतिष्ठापन किंवा इतर संपत्ती अशा कोणत्याही सार्वजनिक संपत्तीच्या बाबतीत कोणतीही कृती करून आगळीक करील त्यास कमीत कमी सहा महिने, परंतु, पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची व द्रव्यदंडाची शिक्षा होईल;
परंतु, न्यायालयास न्यायनिर्णयात नमूद करण्यात येतील अशा कारणांसाठी सहा महिन्यांहून कमी मुदतीच्या कारावासाची शिक्षा देता येईल.