PDPP Act 1984
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नेसल तर,-
(क) आगळीक या शब्दास, भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम ४२५ मध्ये नेमून दिलेल्या अर्थाप्रमाणे अर्थ असेल;
(ख) सार्वजनिक संपत्ती याचा अर्थ, पुढीलपैकी कोणाच्याही मालकीची असेल किंवा ताब्यात असेल किंवा नियंत्रणाखाली असेल अशी कोणतीही सार्वजनिक, – मग ती स्थावर किंवा जंगम असो – (कोणत्याही यंत्रसामग्रीसह) संपत्ती, असा आहे :-
(एक) केंद्र शासन; किंवा
(दोन) कोणतेही राज्य शासन;
(तीन) कोणतेही स्थानिक प्राधिकरण; किंवा
(चार) केंद्रीय, प्रांतीय किंवा राज्य अधिनियमाद्वारे तदन्वये स्थापित झालेला कोणताही निगम;
(पाच) कंपनी अधिनियम, १९५६ याच्या कलम ६१७ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे असणारी कोणतीही कंपनी; किंवा
(सहा) केंद्र शासनाला याबाबतीत शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करता येईल अशी कोणतीही संस्था, परिसंस्था किंवा कोणताही उपक्रम :
परंतु, अशा संस्थांना, परिसंस्थांना किंवा उपक्रमांना, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे केंद्र शासनाकडून किंवा एका किंवा अधिक राज्य शासनांकडून पूर्णपणे किंवा भरीवपणे किंवा केंद्र शासनाकडून अंशत: व एका किंवा अधिक राज्य शासनांकडून अंशत: निधीद्वारे भांडवल पुरवण्यात येत असल्याशिवाय केंद्र शासनास या उपखंडान्वये कोणतीही संस्था, परिसंस्था, किंवा उपक्रम विनिर्दिष्ट करता येणार नाही.