नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १६:
हा अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी असणे :
या अधिनियमात अन्यथा व्यक्तपणे उपबंधित केले असेल तेवढे सोडून एरव्ही या अधिनियमाचे उपबंध त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये अथवा अशा कोणत्याही कायद्याच्या आधारे परिणामक झालेली अशी कोमतीही रुढी किंवा परिपाठ अगर असा कोणताही संलेख अथवा कोणत्याही न्यायालयाचा किंवा अन्य प्राधिकरणाचा कोणताही हुकूमनामा किंवा आदेश यांमध्ये त्या उपबंधाशी विसंगत असे काहीही अंतर्भूत असले तरी, परिणामक होतील.