Pcr act कलम १६ब(ख) : नियम करण्याचा अधिकार :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १६ब(ख) :
नियम करण्याचा अधिकार :
(१) केंद्र शासनाला अधिनियमाच्या अमंलबजावणी करण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचेनद्वारे नियम करता येतील.
(२) या अधिनियमाखाली केंद्र शासनाने केलेला प्रत्येक नियम, तो करण्यास आल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर , ते एक सत्राने अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण तीस दिवसांच्या कालवधीकरत सत्रासीन असताना ठेवला जाईल, आणि पूर्वोक्त सत्राच्या किंवा क्रमवर्ती सत्रांच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर त्या नियमात कोणतेही अपरिवर्तन करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले किंवा तो नियम करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही समागृहांचे मतैक्य झाले तर, त्यानंतर तो नियम, अशा अपरिवर्तीत रुपातच परिणामक होईल किंवा, प्रकरणपरत्वे, मुळीच परिणामक होणार नाही;
तथापि, अशा कोणत्याही अपरिवर्तनामुळे किंवा शून्यीकरणामुळे, तत्पूर्वी त्या नियमांखाली करण्यात आलेल्या कोणत्याही गाष्टींच्या विधिग्राह्यतेला बाधा येणार नाही.
——–
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम १८ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply