नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १५:
१.(अपराध दखलपात्र व संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगे असणे :
(१)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला प्रत्येक अपराध दखलपात्र असेल आणि किमान तीन महिन्यांहून जास्त असेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल असा अपराध खेरीज करुन एरव्ही, अशा प्रत्येक अपराधाबद्दल उक्त संहितेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीनुसार प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्याला किंवा महानगर क्षेत्रात महानगर दंडाधिकाऱ्याला संक्षिप्त संपरिक्ष करता येईल.
(२) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी, जेव्हा एखादा लोकसेवक त्याचे पदाच्या नात्याने असलेले कर्तव्य पार पाडीत असताना किंवा त्याने ते पार पाडण्याचे अभिप्रेत असताना, त्याने या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाला अपप्रेरणा देण्याचा अपराध केला आहे, असे अभिकथन करण्यात आले असेल तेव्हा, कोणतेही न्यायालय,-
(a)(क) (अ) संघराज्याच्या कार्याच्य संबंधात कामावर नेमलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, केंद्र शासनाची, आणि
(b)(ख) (ब) एखाद्या राज्याच्या कार्याच्या संबंधात कामावर नेमलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, राज्य शासनाची, पूर्वमंजुरी घेतल्याखेरीज अपप्रेरणेच्या अपराधाची दखल घेणार नाही.)
——
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम १७ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.