नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १३:
दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेची मर्यादा :
(१) जर एखाद्या दाव्यात किंवा कार्यवाहीत अंतर्भूत असलेली मागणी ही, अथवा एखादा हुकूमनामा किंवा आदेश काढणे अगर त्याची अमलबजावणी करणे हे, या अधिनियमाच्य उपबंधांच्या विरोधी ठरणार असेल तर, कोणतेही दिवाणी न्यायालय असा दावा किंवा कार्यवाही विचारार्थ स्वीकारणार नाही किंवा चालू ठेवणार नाही अथवा असा हुकूमनामा किंवा आदेश काढणार नाही अथवा त्याची अजिबात अमलबजावणी करणार नाही किंवा अंशत: अमलबजावणी करणार नाही.
(२) एखादी बाब अभिनिर्णित करताना अथवा कोणत्याही हुकूमनाम्याची किंवा आदेशाची अमलबजावणी करताना कोणतेही न्यायालय अस्पृश्यते च्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर एखादी नि:समर्थता लादणारी कोणतीही रुढी किंवा परिपाठ मान्य करणार नाही.