गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ३३ :
विनियम करण्याचे अधिकार :
मंडळास, केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरीने, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या आणि त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या तरतुदींशी विसंगत नसतील असे विनियम करुन पुढील गोष्टींची तरतूद करता येईल :-
(a)क) मंडळाच्या बैठकीची वेळ व ठिकाण आणि अशा बैठकीच्या कामकाजासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती, आणि कलम ९ च्या पोट-कलम (१) अन्वये गणपूर्तीसाठी आवश्यक असलेली सदस्यसंख्या ;
(b)ख) कलम ११ च्या पोटकलम (१) अन्वये एखादी व्यक्ती मंडळाशी ज्या रीतीने तात्पुरती सहभागी होईल ती रीत;
(c)ग) कलम १२ अन्वये नियुक्त करण्यात आलेले मंडळाचे अधिकारी व अन्य कर्मचारी यांच्या नियुक्तीची पद्धत, त्याच्या सेवाशर्ती आणि वेतनमान भत्ते ;
(d)घ) सर्वसाधारणपणे मंडळाच्या कामकाजाचे कार्यक्षम चालन.
