Site icon Ajinkya Innovations

Pcpndt act कलम ३१क : १.(अडचणी दूर करणे :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ३१क :
१.(अडचणी दूर करणे :
१) प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे ( विनियमन व गैरवापरास प्रतिबंध) सुधारणा अधिनियम, २००२ च्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र सरकारला राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचण दूर करण्यासाठक्ष त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटेल त्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता येतील :
परंतु असे की, प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे ( विनियमन व गैरवापरास प्रतिबंध) सुधारणा अधिनियम, २००२ (२००३ चा १४) याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर या कलमान्वये कोणताही आदेश दिला जाणार नाही.
२) या कलमाअन्वये काढण्यात आलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे मांडण्यात येईल.)
———-
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम २३ समाविष्ट करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).

Exit mobile version