गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम २५ :
ज्या अधिनियमाच्या किंवा नियमांच्या ज्या तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल कोणत्याही विनिर्दिष्ट शिक्षेची तरतूद केलेली नसेल अशा अधिनियमाच्या किंवा तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दलची शास्ती :
जो कोणी, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करील व त्यासाठी या अधिनियमात अन्यत्र कोठेही कोणत्याही शास्तीची तरतूद केलेली नसेल त्याला तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील, आणि अशा पहिल्या उल्लंघनाचा दोष सिद्ध झाल्यानंतर असे उल्लंघन करणे चालू राहिले तर, ते जेवढे दिवस चालू राहील त्या प्रत्येक दिवसासाठी पाचशे रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या अतिरिक्त द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
