Site icon Ajinkya Innovations

Pcpndt act कलम २४ : १.(प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचा वापर करण्याच्या बाबतीत गृहीतक :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम २४ :
१.(प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचा वापर करण्याच्या बाबतीत गृहीतक :
भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२ ( १८७२ चा १) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, एतद्विरुद्ध काहीही शाबित झाले नाही तर न्यायालय असे गृहीत धरील की, एखाद्या गर्भवती स्त्रीला, तिच्या पतीने किंवा, यथास्थिति, अन्य कोणत्याही नातेवाईकाने कलम ४ च्या पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रयोजनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनांसाठी, प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्यास भाग पाडले होते आणि अशी व्यक्ती, कलम २३ च्या पोटकलम (३) अन्वये केलेल्या अपराधास अपप्रेरणा देण्यासाठी जबाबदार असेल आणि त्या कलमान्वये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधाच्या शिक्षेस पात्र असेल.)
———-
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम २० द्वारे कलम २४ ऐवजी दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).

Exit mobile version