Site icon Ajinkya Innovations

Pcpndt act कलम २० : नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित करणे :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम २० :
नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित करणे :
समुचित प्राधिकरणास स्वत: होऊन किंवा तक्रार प्राप्त झाल्यावरुन, आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय यांना नोटीस काढून त्यांची नोंदणी नोटिशीमध्ये नमूद केलेल्या कारणांसाठी निलंबीत किंवा रद्द का करण्यात येऊ नये याची कारणे दाखवण्यास फर्मावता येईल.
२) जर, आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय यांनी या अधिनियमाच्या किंवा नियमाच्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींचा भंग केला आहे याबाबत समुचित प्राधिकरणाची खात्री पटली तर, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर आणि सल्लागार समितीचा सल्ला विचारात घेतल्यानंतर, त्यास असे केंद्र, प्रयोगशाळा किंवा चिकित्सालय यांच्याविरुद्ध करता येईल अशा कोणत्याही फौजदारी कार्यवाहीस बाध येऊ न देता, त्यास योग्य वाटेल त्या मुदतीकरिता त्यांची नोंदणी निलंबित करता येईल किंवा, यथास्थिति, रद्द करता येईल.
३) पोटकलमे (१) आणि (२) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, जनहितार्थ तसे करणे आवश्यक किंवा इष्ट आहे असे समुचित प्राधिकरणाचे मत झाले असेल तर, त्यास पोटकलम (१) मध्ये निर्देशित केलेली कोणतीही नोटीस न देता, त्याबाबतची कारणे लेखी नोंदवून कोणतेही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय याची नोंदणी निलंबित करता येईल.

Exit mobile version