Site icon Ajinkya Innovations

Pcpndt act कलम १९ : नोंदणी प्रमाणपत्र :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम १९ :
नोंदणी प्रमाणपत्र :
१) समुचित प्राधिकरण, चौकशी केल्यानंतर, आणि अर्जदाराने या अधिनियमाच्या व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांच्या आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे अशी स्वत:ची खात्री पटल्यानंतर आणि सल्लागार समितीच्या यासंबंधी दिलेला सल्ला लक्षात घेऊन आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा, यथास्थिति, आनुवंशिकीय चिकित्सालय यांना संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे विहित नमुन्यातील नोंदणी प्रमाणपत्र देईल.
२) जर चौकशी केल्यानंतर आणि अर्जदारास आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर व सल्लागार समितीचा सल्ला लक्षात घेतल्यानंतर, अर्जदाराने या अधिनियमाखालील किंवा नियमाखालील आवश्यक बाबींची पूर्तता केलेली नाही याबाबत समुचित प्राधिकरणाची खात्री पटल्यास, ते, नाकारण्यासंबंधीच्या कारणांची लेखी स्वरुपात नोंद करुन, नोंदणीचा अर्ज नाकारील.
३) प्रत्येक नोंदणी प्रमाणपत्राचे विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा मुदतीनंतर आणि फी दिल्यानंतर नवीकरण करण्यात येईल.
४) नोंदणीकृत आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय यांच्या व्यवसायाच्या जागेत, ठळक ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र लावण्यात येईल.

Exit mobile version