Site icon Ajinkya Innovations

Pcpndt act कलम १७क : १.(समुचित प्राधिकरणाचे अधिकार :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम १७क :
१.(समुचित प्राधिकरणाचे अधिकार :
समुचित प्राधिकरणास, पुढील बाबतीत अधिकार असतील :-
(a)क) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचा भंग करण्याच्या संबंधातील कोणतीही माहिती बाळगणाऱ्या अशा कोणत्याही व्यक्तीस समन्स पाठवणे ;
(b)ख) खंड (क) शी संबंधित कोणताही दस्तऐवज किंवा महत्वाची वस्तू सादर करणे ;
(c)ग) लिंग निवड तंत्रे किंवा प्रसव-पूर्व लिंग निर्धारण करण्यामध्ये गुंतल्याचा संशय असलेल्या कोणत्याही ठिकाणाची झडती घेण्यासाठी वॉरंट काढणे ; आणि
(d)घ) विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब.)
———
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम १६ द्वारे समाविष्ट करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).

Exit mobile version