गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ८ :
सदस्यांचा पदावधी :
१) पदसिद्ध सदस्यांखेरीज अन्य सदस्यांचा पदावधी,-
(a)क) कलम ७ च्या पोट-कलम (२) च्या खंड (ङ) किंवा खंड (च) अन्वये नियुक्ती केली असेल तर, तीन वर्ष : १.(***)
२.(परंतु असे की, कलम ७ च्या पोट-कलम (२) च्या खंड (च) अन्वये निवडून आलेल्या सदस्याचा पदावदी, तो मंत्री किंवा उपमंत्री किंवा लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचा उपसभापती होताच किंवा तो जेथून निवडून आला असेल त्या सभागृहाचा सदस्य असण्याचे बंद होताच संपुष्टात येईल ; आणि)
(b)ख) उक्त पोट-कलमाच्या खंड (छ) अन्वये नियुक्ती केली असेल तर एक वर्ष इतका असेल.
२) इतर कोणत्याही सदस्याचे नैमत्तिक पद मग त्याचा मृत्यु, राजीनामा किंवा त्याच्या आजारपणामुळे त्याची कार्ये पार पाडण्यास येणारी असमर्थता किंवा इतर अक्षमता यामुळे असो रिक्त झाले तर, असे रिक्त पद केंद्र सरकार, नव्याने नियुक्ती करुन भरील आणि अशा रीतीने नियुक्त करण्यात आलेला सदस्य, तो जिच्या जागेवर नियुक्त करण्यात आला असेल त्या व्यक्तीच्या पदावधीतील उर्वरित कालावधीसाठी ते पद धारण करील.
३) उपाध्यक्ष, अध्यक्षाकडून त्यास वेळोवेळी नेमून देण्यात येतील अशी कार्ये पार पाडील.
४) आपापली कार्ये पार पाडण्याकरिता सदस्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती विहित केल्याप्रमाणे असेल.
———-
१. सन २००१ चा अधिनियम क्रमांक ३२, कलम २ द्वारे, आणि हा शब्द वगळण्यात आला (३ सप्टेंबर २००१ रोजी व तेव्हापासून)
२. सन २००१ चा अधिनियम क्रमांक ३२, कलम २ द्वारे, हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.(३ सप्टेंबर २००१ रोजी व तेव्हापासून)