बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम ९ :
बालकाशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरूषास शिक्षा :
जी कोणी, अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचा प्रौढ पुरूष असताना, बालविवाहाचा करार करील ती व्यक्ती, दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाच्या शिक्षेस पात्र असेल किंवा या दोन्हीही शिक्षेस पात्र असेल.