बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम ५ :
बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह :
(१) जेव्हा बालविवाहातून बालकांचा जन्म झाला असेल तेव्हा, जिल्हा न्यायालय अशा बालकांच्या ताब्यासाठी योग्य आदेश देईल.
(२) या कलमान्वये बालकाच्या ताब्यासाठी आदेश देतेवेळी बालकाचे कल्याण व सर्वोत्तम हित याचा जिल्हा न्यायालयाद्वारे सर्वोच्च विचार करण्यात येईल.
(३) बालकाच्या ताब्याच्या आदेशामध्ये, बालकाचे सर्वोच्च हित जपले जाईल, अशा रीतीने दुसऱ्या पक्षास प्रवेश देण्यासाठीच्या यथोचित निदेशांचा आणि बालकांच्या हितार्थ, जिल्हा न्यायालयास योगय वाटतील अशा अन्य आदेशांचा समावेश असेल.
(४) जिल्हा न्यायालय, विवाहातील पक्षकाराने किंवा त्याच्या माता-पित्याने किंवा पालकाने बालकास निर्वाहखर्च पुरविण्यासाठी देखील आदेश देऊ शकेल.