Pcma act कलम २ : व्याख्या :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात, अन्य दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, –
(a)(क)(अ) बालक याचा अर्थ, जर ती व्यक्ती पुरूष असेल तर जिने एकवीस वर्षे वय पूर्ण केलेले नाही आणि जर महिला असेल तर, जिने अठरा वर्षे वय पूर्ण केलेले नाही, अशी व्यक्ती, असा आहे;
(b)(ख)(ब) बालविवाह याचा अर्थ, ज्या विवाह करारातील एक पक्ष बालक आहे असा विवाह, असा आहे;
(c)(ग) (क)विवाहाच्या संबंधातील करारातील विवाहपक्ष याचा अर्थ, ज्यांचा विवाह विधिपूर्वक लावण्यात येत आहे किंवा ज्याचा विवाह संपन्न होणार आहे, असा कोणताही पक्ष असा आहे;
(d)(घ) (ड) बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यामध्ये कलम १६ च्या पोटकलम (१) अन्वये नियुक्त केलेल्या बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याचा समावेश होतो;
(e)(ड) (इ) जिल्हा न्यायालय याचा अर्थ, ज्या क्षेत्रासाठी, कुटुंब न्यायालय अधिनियम, १९८४ (१९८४ चा ६६) याच्या कलम ३ अन्वये स्थापन केलेले कुटुंब न्यायालय, अस्तित्वात आहे अशा कोणत्याही क्षेत्रामधील असे कुटुंब न्यायालय आणि ज्या क्षेत्रासाठी कुटुंब न्यायालय नाही; परंतु शहर दिवाणी न्यायालय अस्तित्वात आहे, अशा कोणत्याही क्षेत्रामधील ते न्यायालय आणि अन्य कोणत्याही क्षेत्रामधील, मूळ अधिनियमाचया संबंधातील प्रकरणांच्या बाबतीत अधिकारिता असल्याप्रमाणे शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे राज्य शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल, अशा अन्य कोणत्याही दिवाणी न्यायालयाचा समावेश होतो;
(f)(च) (फ)अज्ञान याचा अर्थ, सज्ञानत्व अधिनियम, १८७५ (१९७५ चा १) याच्या तरतुदीन्वये, जिने सज्ञानत्व प्राप्त केले नसल्याचे मानण्यात आले आहे अशी व्यक्ती, असा आहे.

Leave a Reply