बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम २१ :
निरसन व व्यावृत्ती :
(१) बालविवाह निर्बंधक अधिनियम, १९२९ (१९२९ चा १९) याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
(२) असे निरसन झाले असले तरीही, या अधिनियमाच्या प्रारंभास उक्त अधिनियमाखाली प्रलंबित असणारी किंवा चालू असलेली सर्व प्रकरणे किंवा उक्त कार्यवाह्या जणू काही हा अधिनियम संमत केलेला नव्हता असे समजून निरसित अधिनियमाच्या तरतुदीनुसार चालविण्यात येतील व निकालात काढण्यात येतील.