बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
(२००७ चा ६) (१० जानेवारी २००७)
प्रस्तावना :
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
बालविवाह करण्यास प्रतिबंध करण्याकरिता आणि तत्संबंधित व तदनुषगिंक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या सत्तावन्नाव्या वर्षी संसदेद्वारे तो पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे :-
————
(१) या अधिनियमास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ असे म्हणावे.
(२) तो १.(***) संपूर्ण भारतभर लागू असेल; आणि तो भारतात नसलेल्या व भारताबाहेर असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना लागू असेल :
परंतु, या अधिनियमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट पाँडेचरी संघराज्य क्षेत्राच्या रेनॉनकॅटसला (रनोन्साँ / संत्यागी) लागू असणार नाही.
(३) केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास तो अंमलात येईल; आणि विविध राज्यांसाठी विविध दिनांक नेमून देता येऊ शकतील आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या कोणत्याही तरतुदीमधील कोणत्याही संदर्भाचा, त्या राज्यामध्ये त्या तरतुदी अंमलात आणण्याचा संदर्भ असल्याप्रमाणे कोणत्याही राज्याच्या संबंधात अन्वयार्थ लावण्यात येईल.
——-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ९५ आणि अनुसूची ५ अन्वये जम्मू व काश्मीर राज्याखेरीज मजकूर वगळण्यात आले.