Pcma act कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम १२ :
विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे :
जेव्हा बालकास ते अज्ञान असताना, –
(a)(क)(अ) कायदेशीर पालकाच्या ताब्यातून भुरळ पाडून घेतले असेल तेव्हा; किंवा
(b)(ख)(ब) बळजबरीने भाग पाडून किंवा कोणत्याही फसवणुकीच्या मार्गाने फूस लावून कोणत्याही ठिकाणाहून जाण्यास प्रवृत्त केले असेल तेव्हा; किंवा
(c)(ग) (क)विवाहाच्या प्रयोजनार्थ विक्री केली असेल तेव्हा; आणि विवाहाच्या स्वरूपात जाण्यास तयार केले असेल तेव्हा किंवा जर अज्ञान व्यक्तीची विक्री केल्यानंतर किंवा त्याचा अपव्यापार केल्यानंतर किवां त्याचा अनैतिक प्रयोजनार्थ वापर केल्यानंतर अज्ञान व्यक्तीचा विवाह झाला असेल तर,
असा विवाह शून्य व अवैध ठरेल.

Leave a Reply