बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम ११ :
बालविवाहाचा विधी संपन्न करण्यास चालना दिल्याबद्दल किंवा परवानगी दिल्याबद्दल शिक्षा :
(१) जेव्हा एखादे बाल विवाह करते तेव्हा, बालकाचा प्रभार असणारी कोणतीही व्यक्ती, – मग ती मातापिता म्हणून, किंवा पालक म्हणून किंवा अन्य कोणतीही व्यक्ती म्हणून, असो किंवा अन्य कोणत्याही कायदेशीर किंवा बेकायदेशीर क्षमतेने असो – त्याचबरोबर एखाद्या संघटनेचा किंवा व्यक्तींच्या अधिसंघाचा कोणताही सदस्य असो – जो विवाह विधि संपन्न करण्यास चालना देण्याचे किंवा त्यास परवानगी देण्याचे कृत्य करते, किंवा बालविवाहात उपस्थित राहण्यासह किंवा त्यात भाग घेण्यास तो विधिपूर्वक संपन्न होण्यास प्रतिबंध करण्यास जाणीवपूर्वकपणे कसूर करते ती व्यक्ती, दोन वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल आणि एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाच्या शिक्षेस पात्र असेल.
परंतु, कोणत्याही महिलेस कारावासाची शिक्षा होणार नाही.
(२) या कलमाच्या प्रयोजनार्थ, विरूद्ध सिद्ध झाले नसेल तर व तोपर्यंत, असे गृहित धरण्यात येईल की, जेव्हा अज्ञान बालक विवाहाचा करार करते तेव्हा, अशा अज्ञान बालकाचा प्रभार असणारी व्यक्ती, विवाह संपन्न होण्यापासून प्रतिबंध करण्यास जाणीवपूर्वक निष्फळ ठरते.