Site icon Ajinkya Innovations

Pca act 1988 कलम ७क (अ) : भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून कोणत्याही लोकसेवकाला प्रभावित करुन अनुचित फायदा घेणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम ७क(अ) :
१.(भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून कोणत्याही लोकसेवकाला प्रभावित करुन अनुचित फायदा घेणे :
जो कोणी, भ्रष्ट्र किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्ति प्रभावाचा वापर करुन कोणत्याही लोकसेवकाला, स्वत: किंवा कोणत्याही अन्य लोकसेवका द्वारे लोक कर्तव्याचे कार्यपाला अयोग्यरित्या किंवा बेईमानीने करणे किंवा अशा कर्तव्याचे कार्यपालन पूर्ण न करणे किंवा पूर्ण न करवून देणे या आशयाने की बक्षिसाच्या स्वरुपात कोणताही अनुचित फायदा मिळवितो किंवा स्विकारतो किंवा मिळविण्याचा प्रयत्न करतो, तो तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासास, आणि द्रव्यदंडासही पात्र होईल.)
——–
१. सन २०१८ का अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ४ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version