Pca act 1988 कलम २६ : १९५२ चा अधिनियम क्र.४६ अन्वये नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश हे या अधिनियमाखाली नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश असणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २६ :
१९५२ चा अधिनियम क्र.४६ अन्वये नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश हे या अधिनियमाखाली नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश असणे :
फौजदारी विधी सुधारणा अधिनियम, १९५२ या अन्वये कोणत्याही क्षेत्रासाठी किंवा क्षेत्रांसाठी नियुक्त करण्यात आलेला व या अधिनियमाच्या प्रारंभी पद धारण करणारा प्रत्येक विशेष न्यायाधीश, या अधिनियमाच्या कलम ३ खाली त्या क्षेत्रासाठी किंवा क्षेत्रांसाठी नियुक्त करण्यात आलेला विशेष न्यायाधीश असल्याचे मानण्यात येईल आणि त्यानुसार, अशा प्रारंभाच्या तारखेस व तारखेपासून असा प्रत्येक न्यायाधीश, या अधिनियमातील तरतुदींअनुसार अशा प्रारंभाच्या तारखेस त्याच्यापुढे प्रलंबित असलेल्या सर्व कार्यवाह्यांबाबतचा व्यवहार पुढे चालू ठेवील.

Leave a Reply