Pca act 1988 कलम २५ : भू-सैनिकी, नौ-सैनिकी, आणि वायु- सैनिकी किंवा इतर कायदे बाधित होणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २५ :
भू-सैनिकी, नौ-सैनिकी, आणि वायु- सैनिकी किंवा इतर कायदे बाधित होणे :
(१) या अधिनियमात कोणत्याही बाबीमुळे, भूसैनिकी अधिनियम, १९५० (१९५० चा ४५), वायुसैनिकी अधिनियम, १९५० (१९५० चा ४६), नौसैनिकी अधिनियम, १९४५ (१९४५ चा ६२), सीमा सुरक्षाबल अधिनियम, १९६८ (१९६८ चा ४७), तटरक्षक अधिनियम, १९७८ (१९७८ चा ३०) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक अधिनियम, १९८६ (१९८६ चा ४७) याखाली कोणतेही न्यायालय किंवा प्राधिकरण यांनी वापरावयाची अधिकारता किंवा त्यास लागू असणारी कार्यपध्दती यास कोणताही बाध येणार नाही.
(२)शंकांचे निरसन करण्यासाठी याद्वारे हे जाहीर करण्यात येत आहे की, पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही अशा कायद्याच्या प्रयोजनासाठी विशेष न्यायालय असल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply