Pca act 1988 कलम २३ : १.(कलम १३(१)(अ)) याखालील, अपराधांच्या संबंधातील आरोपांचा तपशील :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २३ :
१.(कलम १३(१)(अ)) याखालील, अपराधांच्या संबंधातील आरोपांचा तपशील :
फौजदारी प्रक्रिया, संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, जेव्हा कलम १३ च्या पोटकलम, (१) २.(खंड (अ)) अन्वये आरोपीवर अपराधविषयक आरोप ठेवण्यात येत असेल तेव्हा, अशा आरोपपत्रामध्ये, ज्या मालमत्तेसंबंधी अपराध केल्याचे अभिकथित असेल अशा मालमत्तेचे आणि ज्या तारखांच्या दरम्यान अपराध घडला असण्याचे अभिकथित असेल अशा मालमत्तेच्या विशिष्ट बाबी किंवा सदर संहितेच्या कलम २१९ च्या अर्थांतर्गत, अशा प्रकारे ठेवण्यात आलेला आरोप ही एकाच अपराधाचा आरोप असल्याचे मानण्यात येईल :
परंतु, अशा तारखांपैकी पहिली व शेवटची तारीख यामध्ये एक वर्षापेक्षा अधिक कालावधी असणार नाही.
————-
१. २०१८ चा १६ कलम १६ द्वारा (कलम १३(१)(क)) शब्दोंऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१८ चा १६ कलम १६ द्वारा (खंड (क)) शब्दोंऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply