Pca act 1988 कलम २२ : विवक्षित फेरबदलांच्या अधीनतेने फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ लागू होणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २२ :
विवक्षित फेरबदलांच्या अधीनतेने फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ लागू होणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यातील तरतुदी या कलमखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाच्या संबंधातील कोणत्याही तरतुदींना लागू असताना त्या जणू काही;
(a) क) अ)कलम २४३ च्या पोटकलम (१) मध्ये आरोपीला त्यानंतर बोलावण्यात येईल या मजकुराऐवजी, आरोपीने त्यानंतर तात्काळ किंवा न्यायालय परवानगी देईल अशा वेळेच्या आत, आपले साक्षीदार म्हणून ज्यांची तपासणी करण्याचे त्याने योजिले आहे अशा (कोणत्याही असल्यास) व्यक्तीची आणि ज्यावर तो विसंबून राहणार असेल अशा (कोणत्याही असल्यास )दस्तऐवजांची लेखी स्वरूपातील सूची देणे आवश्यक करण्यात येईल हा मजकूर घालण्यात आला असावा त्याप्रमाणे,
(b) ख) ब) कलम ३०९ च्या पोटकलम (२) मध्ये तिसऱ्या परंतुकानंतर पुढील परंतुक घालण्यात आले असावे त्याप्रमाणे; ते असे:- परंतु तसेच की, कार्यवाहीतील पक्षकर असलेल्या व्यक्तीने कलम ३९७ अन्वये अर्ज दाखल केला आहे केवळ या सबबीवर कार्यवाही स्थगित केली जाणार नाही किंवा पुढे ढकलली जाणार नाही;
(c) ग) क) कलम ३९७ च्या पोटकलम (२) नंतर पुढील पोटकलम दाखल करण्यात आले असावे त्याप्रमाणे –
(३) पोटकलम (१) पोटकलम (२) यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, न्यायाधीशास, त्याने नोंद करावयाच्या कारणास्तव त्याला योग्य वाटल्यास, आरोपी किंवा त्याचा वकील यांच्या अनुपस्थितीत चौकशी खटला पुढे सुरू ठेवता येईल आणि उलटतपासणीसाठी साक्षीदाराला पुन: बोलावण्याच्या आरोपीच्या अधिकाराच्या अधीनतेने कोणत्याही साक्षीदाराची साक्ष नोंदवता येईल ;
(d) घ) ड) कलम ३९७ च्या पोटकलम (१) मध्ये, स्पष्टीकरणापूर्वी पुढील परंतुक घालण्यात आले असावे त्याप्रमाणे :
परंतु अशा कार्यवाहीतील पक्षकाराने केलेल्या अर्जावरून न्यायालय या कलमाखालील त्याच्या अधिकारांचा वापर करत असेल अशा बाबतीत न्यायालय;
(a) क) अ)अभिलेख का मागण्यात येऊ नयेत याविषयीचे कारण दाखवण्याची इतर पक्षकाराला संधी दिल्याखेरीज, किंवा
(b) ख) ब) कार्यवाहीखालील अभिलेखांची तपासणी प्रमाणित प्रतींवरून करता येईल अशी त्याची खात्री झाल्यास,
सर्वसाधारणपणे अभिलेख मागवणार नाही.

Leave a Reply