भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २१ :
आरोपी व्यक्ती सक्षम साक्षीदार असणे :
या कलमानुसार शिक्षापात्र अपराधाचा जिच्यावर आरोप ठेवण्यात आला असेल अशा कोणत्याही व्यक्तीस बचाव पक्षासाठी सक्षम साक्षीदार होता येईल आणि त्याच खटल्यात, तिच्याविरूध्द किंवा तिच्याबरोबरच आरोपी ठेवण्यात आलेल्या व्यक्तीविरूध्द करण्यात आलेले आरोप खोडून काढण्यासाठी शपथेवर साक्ष देता येईल, :
परंतु, –
(a)क) अ)त्याला, त्याने स्वत: विनंती केली असल्याशिवाय साक्षीदार म्हणून बोलावण्यात येणार नाही;
(b)ख) ब)त्या व्यक्तीने साक्ष न दिल्यास त्याबाबत अभियोगपक्ष कोणतीही टीकाटिप्पणी करणार नाही किंवा तिच्याविरूध्द किंवा त्याच खटल्यात तिच्याबरोबर आरोप करण्यात आलेल्या इतर व्यक्तीविरूध्द कोणत्याही गृहीतकास कारणीभूत होणार नाही.
(c)ग) क)ज्याविषयी तिच्याविरूध्द आरोप करण्यात आला आहे अशा अपराधासाठी ती सिध्ददोषी ठरली आहे किंवा वाईट चारित्र्याची आहे असे दर्शविण्याकडे कल असलेला कोणताही प्रश्न विचारण्यात येणार नाही आणि विचारण्यात आल्यास अशा प्रश्नाचे उत्तर देणे तिला आवश्यक असणार नाही, मात्र-
१)तिने अपराध केलेला आहे किंवा अशा अपराधासाठी ती सिध्ददोषी ठरली आहे याविषयीचा पुरावा, अशी व्यक्ती ज्या अपराधाविषयीचा तिच्यावर आरोप ठेवण्यात आला असेल त्या अपराधासाठी दोषी आल्याबाबतचा ग्राह्य पुरावा असेल, किंवा
२)तिने व्यक्तिश: किंवा आपल्या वकिलामाङ्र्क त आपले स्वत:चे चांगले चारित्र्य प्रस्थापित करण्याच्या हेतूने अभियोग पक्षाच्या कोणत्याही साक्षीदाराला कोणताही प्रश्न विचारला असेल किंवा बचावाचे स्वरूप किंवा कामाची पध्दती अशी असेल की, अभियोग व्यक्तीच्या किंवा तिच्या कोणत्याही साक्षीदाराच्या चारित्र्याचे हनन करणे अंतर्भूत असेल, किंवा
३) त्याच अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही इतर व्यक्तीविरूध्द तिने साक्ष दिली असल्यास तिला त्याबाबत प्रश्न विचारता येतील व त्या प्रश्नांची उत्तरे देणे तिला आवश्यक राहील.