Pca act 1988 कलम २० : जेथे लोकसेवक अवाजवी फायदा स्वीकारतो अशा वेळेचे गृहीतक :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २० :
१.(जेथे लोकसेवक अवाजवी फायदा स्वीकारतो अशा वेळेचे गृहीतक :
१) कलम ७ किंवा कलम ११ याखाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही खटल्याच्या वेळी, आरोपी व्यक्तीने स्वत:साठी किंवा कोणत्याही इतर व्यक्तीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून (कायदेशीर पारिश्रमिकाखेरीज इतर) कोणतेही परितोषण किंवा कोणतीही मूल्यवान वस्तू स्वीकारली असल्याचे, प्राप्त केली असल्याचे किंवा स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे किंवा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सिध्द झाल्यास, त्याविरूध्द सिध्द होईपर्यंत, त्या व्यक्तीने, कलम ७ मध्ंये निर्देशिलेल्या प्रलोभन किंवा बक्षीस, मोबदला दिल्याशिवाय किंवा जो पुरेसा नाही हे माहीत असताना असा मोबदला देऊन तसे परितोषण किंवा यथास्थिति, मूल्यवान वस्तू स्वीकारली, प्राप्त केली, स्वीकारण्यास मान्यता दिली किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला किंवां त्याने स्वीकारले आहे किंवां प्राप्त केले आहे, ज्याबाबतीत कलम ११ अन्वये अपुरे असल्याचे माहित असलेले प्राप्त केले आहे किंवा प्राप्त करण्याचा प्रयत्न केले आहे, असे गृहीत धरण्यात येईल.)
———-
१. कलम २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम १५ द्वारा मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
—————
कलम २० :
लोकसेवक कायदेशीर पारिश्रमिकाशिवाय इतर परितोषण स्वीकारित असेल अशा वेळेचे गृहीतक :
१) कलम ७ किंवा कलम ११ किंवा कलम १३चे पोटकलम (१), खंड(अ) किंवा खंड (ब) याखाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही खटल्याच्या वेळी, आरोपी व्यक्तीने स्वत:साठी किंवा कोणत्याही इतर व्यक्तीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून (कायदेशीर पारिश्रमिकाखेरीज इतर) कोणतेही परितोषण किंवा कोणतीही मूल्यवान वस्तू स्वीकारली असल्याचे, प्राप्त केली असल्याचे किंवा स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे किंवा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सिध्द झाल्यास, त्याविरूध्द सिध्द होईपर्यंत, त्या व्यक्तीने, कलम ७ मध्ंये निर्देशिलेल्या प्रलोभन किंवा बक्षीस, मोबदला दिल्याशिवाय किंवा जो पुरेसा नाही हे माहीत असताना असा मोबदला देऊन तसे परितोषण किंवा यथास्थिति, मूल्यवान वस्तू स्वीकारली, प्राप्त केली, स्वीकारण्यास मान्यता दिली किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला, असे गृहीत धरण्यात येईल.
(२)कलम १२ किंवा कलम १४ च्या खंड (ब) अन्वये शिक्षापात्र अपराधाविषयीचा कोणताही खटला चालू असता, आरोपी व्यक्तीने (कायदेशीर पारिश्रमिकाव्यतिरिक्त) कोणतेही परितोषण किंवा मूल्यवान वस्तू दिली असल्याचे किंवा देण्याचे कबूल केले असल्याचे किंवा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सिध्द झाल्यास, त्या विरूध्दचे सिध्द होईपर्यंत, त्या व्यक्तीने कलम ७ मध्ये निर्देशिलेले प्रलोभन किंवा बक्षीस कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा यथास्थिति, जो पुरेसा नाही असे माहीत असताना असा मोबदला देऊन, ते परितोषण किंवा ती मूल्यवान वस्तू दिली किंवा देण्याचे कबूल केले देण्याचा प्रयत्न केला असे गृहीत धरण्यात येईल.
(३) पोटकलमे (१) व (२) यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, जर असे परितोषण किंवा वर वर्णन केलेली वस्तू न्यायालयाच्या मते, ज्यावरून भ्रष्टाचार घडला असे अनुमान काढणे अनुचित ठरेल एवढया क्षुद्र स्वरूपाची असल्यास, न्यायालय, सदर पोटकलमांपैकी कोणत्याही पोटकलमात निर्देशिलेले गृहीतक काढण्यास नकार देऊ शकेल.

Leave a Reply