भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
(१९८८ चा अधिनियम क्रमांक ४९)
(९ सप्टेंबर १९८८)
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव व विस्तार :
१) या अधिनियमास भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ असे म्हणता येईल.
२) १.(***) संपूर्ण भारतभर याचा विस्तार असेल, तसेच तो भारताबाहेरील सर्व भारतीय नागरिकांनाही लागू असेल.
———–
१. सन २०१९ चा अधिनियम क्रमांक ३४ कलम ९५ व पाचव्या अनुसूची द्वारा (जम्मू व काश्मीर राज्याव्यतिरिक्त) शब्द वगळण्यात आले.