भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम १६ :
द्रव्यदंड निश्चित करण्याकरिता विचारात घ्यावयाच्या बाबी :
१.(कलम ७ किंवा कलम ८ किंवा कलम ९ किंवा कलम १० किंवा कलम ११ किंवा कलम १३ चे पोटकलम (२) किंवा कलम १४ किंवा कलम १५) नुसार दंडाची शिक्षा लादण्यात आली असल्यास, न्यायालय, दंड निश्चित करतेवेळी,आरोपीने अपराधाद्वारे कोणतीही मालमत्ता प्राप्त केली असल्यास अशा मालमत्तेचे मूल्य किंवा दोषसिध्दी ही कलम १३ चे पोटकलम (१), २.(खंड (ब) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधासाठी असेल अशा बाबतीत, ज्याबाबत आरोपी व्यक्ती समाधानकारक हिशेब देण्यास असमर्थ आहे असे त्या खंडामध्ये विनिर्दिष्ट केलेली आर्थिक साधने किंवा मालमत्ता विचारात घेईल.
———–
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ कलम १० द्वारा (कलम १३ चे पोटकलम (२) नुसार किंवा कलम १४) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ कलम १० द्वारा (खंड (ई) या शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.