प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ९ :
मंडळाची कार्ये :
मंडळाची कार्ये पुढीलप्रमाणे असतील :
(a)(क)(अ) सतत अभ्यास करून प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यासाठी भारतात कायद्याचा अंमल चालू ठेवणे आणि अशा कोणत्याही कायद्यात विशोधने करण्यासाठी शासनाला वेळोवेळी सल्ला देणे;
(b)(ख)(ब) प्राण्यांना उगाच होणाऱ्या यातना किंवा वेदना यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सर्व सामान्यत: आणि विशेष करून प्राण्यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परिवहन करण्यात येत असेल तेव्हा किंवा खेळ करणारे प्राणी म्हणून त्यांचा उपयोग केला जात असेल तेव्हा किंवा ते बंदिस्त किंवा परिरूद्ध असतील तेव्हा त्यांना उगाचच होणाऱ्या यातना किंवा वेदना यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने या अधिनियमाखाली नियम करण्याबाबत केंद्र सरकारला सल्ला देणे;
(c)(ग)(क) भारवाही प्राण्यांचे (डॉट अॅनिमल) कष्ट कमी व्हावे यासाठी वाहनाच्या संकल्पचित्रात सुधारणा करण्याच्या बाबतीत, शासनाला किंवा कोणत्याही स्थानिक, प्राधिकरणाला किंवा इतर व्यक्तीला सल्ला देणे;
(d)(घ)(ड) गोठे, पाण्याच्या द्रोणी आणि तत्सम गोष्टी बांधण्यास उत्तेजन देऊन किंवा बांधण्याची तरतूद करून आणि प्राण्यांना वैद्यकीय मदत देण्याची तरतूद करून १.(प्राण्यांची स्थिती सुधारण्यासाठी) मंडळाला योग्य वाटतील अशा सर्व उपाययोजना करणे.
(e)(ङ)(इ) कत्तलीपूर्वीच्या काळात प्राण्यांना उगाचच होणाऱ्या यातना किंवा वेदना मग त्या शारीरिक असोत किंवा मानसिक असोत कमी केल्या जातील, अशा प्रकारे कत्तलखान्यांचे संकल्पचित्र तयार करण्याबाबत किंवा त्यांचे परिरक्षण करण्याबाबत आणि आवश्यक असेल तेव्हा, शक्य तेथवर दयाबुद्धी ठेवून प्राण्यांना ठार करण्याबाबत शासनाला किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाला किंवा अन्य व्यक्तीला सल्ला देणे;
(f)(च)(फ) नको असणारे प्राणी एकतर तत्क्षणी किंवा यातना किंवा वेदना यांच्याबाबतीत तो प्राणी संवेदनाशून्य झाल्यावर, स्थानिक प्राधिकरणाने त्याला मारून टाकणे आवश्यक आहे याबद्दल स्वत:ची खात्री करून घेण्यासाठी मंडळास योग्य वाटतील अशा सर्व उपाययोजना करणे;
(g)(छ) (ग) प्राणी किंवा पक्षी म्हातारे व निरूपयोगी झाले असतील आणि त्यांना संरक्षणाची गरज असताना त्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना जेथे आश्रय मिळेल असे १.(पांजरपोळ, सुरक्षागृहे, प्राण्यांसाठी आश्रयस्थाने, अभयस्थाने आणि तत्सम ठिकाणे तयार करण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी) वित्तीय साहाय्य देऊन किंवा अन्य प्रकारे उत्तेजन देणे;
(h)(ज) (ह) प्राण्यांना उगाचच यातना किंवा वेदना देण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा प्राणी आणि पक्षी याचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ स्थापन करण्यात आलेल्या संघांना किंवा संस्थांना सहकार्य करणे आणि त्यांच्या कामात समन्वय साधणे;
(i)(झ)(आय) कोणत्याही स्थानिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्राणी कल्याण संघटनांना वित्तीय आणि इतर साहाय्य देणे किंवा मंडळाच्या सर्वसाधारण पर्यवेक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी ज्या काम करतात, अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात प्राणी कल्याणकारी संघटना तयार करण्यास उत्तेजन देणे;
(j)(ञ)(जे) प्राणी रूग्णालयात तरतूद करण्यात येईल अशी वैद्यकीय परिचर्या व प्राण्यांची वैद्यकीयदृष्ट्या काळजी घेणे व या बाबींच्या संबंधात आणि मंडळाला तसे करणे आवश्यक वाटेल तेव्हा प्राणी रूग्णालयाला वित्तीय आणि इतर साहाय्य पुरवण्यासाठी शासनाला सल्ला देणे;
(k)(ट)(के) प्राण्यांना भूतदयेने वागवण्यासंबंधी शिक्षण देणे आणि प्राण्यांना उगाचच वेदना व यातना देण्याविरूद्ध जनमत तयार करण्यासाठी आणि व्याख्याने, पुस्तके, भित्तिपत्रके, चलचित्रपट, प्रदर्शने आणि तत्सम साधनांनी प्राण्याच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तेजन देणे;
(l)(ठ)(एल) प्राणी कल्याणाशी संबंधित किंवा प्राण्यांना उगाचच दिल्या जाणाऱ्या वेदना व यातना यांना प्रतिबंध करण्याशी संबंधित कोणत्याही बाबींवर शासनाला सल्ला देणे;
——-
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ९ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.