Pca act 1960 कलम ६ : १.(मंडळाच्या सदस्यांचा पदावधी आणि त्यांच्या सेवाशर्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ६ :
१.(मंडळाच्या सदस्यांचा पदावधी आणि त्यांच्या सेवाशर्ती :
(१) कलम ५क(अ) अन्वये ज्या कालावधीसाठी मंडळ पुनर्घटित होऊ शकेल, तो कालावधी पुनर्घटनेच्या दिनांकापासून तीन वर्ष असेल आणि अशा प्रकारे पुनर्घटित करण्यात आलेल्या मंडळाच्या अध्यक्ष किंवा अन्य सदस्य ज्या कालावधीसाठी मंडळ पुनर्घटित करण्यात आले असेल तो समाप्त होईपर्यंत पद धारण करील.
(२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, –
(a)(क)(अ) पदसिद्ध सदस्याचा पदावधी, तो ज्याच्या आधारे असा सदस्य झाला असेल त्या आधारे तो पद धारण करण्याचे चालू ठेवील;
(b)(ख)(ब) व्यक्तींच्या निकायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कलम ५ च्या खंड (ग), खंड (ङ), खंड (च), खंड (छ), खंड (ज) किंवा खंड (झ) अन्वये निवडून दिलेल्या किंवा निवडलेल्या सदस्यांचा पदावधी, ज्यांनी त्याला निवडून दिले किंवा ज्यांच्या बाबतीत तो, निवडला गेला होता, त्या निकायाचे सदस्य असण्याचे बंद झाल्यानंतर लगेचच समाप्त होईल;
(c)(ग) (क)नैमित्तिक रिकामे पद भरण्यासाठी नियुक्त केलेल्या, नामनिर्देशित केलेल्या, निवडून दिलेल्या किंवा निवडलेल्या सदस्यांचा पदावधी ज्यांच्या जागी तो नियुक्त झाला आहे, नामनिर्देशित झाला आहे, निवडून दिला आहे किंवा निवडला आहे त्या सदस्याच्या पदाच्या उरलेल्या कालावधीपर्यंत चालू राहील;
(d)(घ) (ड)केंद्र सरकार कोणत्याही वेळी, कारणे लेखी नमूद करून, त्या कारणास्तव, त्याला काढून टाकण्याच्या प्रस्तावाविरूद्धची कारणे दाखवण्याची वाजवी संधी दिल्यानंतर, त्याला काढून टाकू शकेल आणि अशा काढून टाकल्यामुळे रिक्त झालेले कोणतेही पद खंड (ग) च्या प्रयोजनार्थ नैमित्तिकरीत्या रिक्त झालेले पद असल्याचे समजण्यात येईल.
(३) मंडळाच्या सदस्यांना, मंडळाने केंद्र सरकारच्या पूर्वमान्यतेच्या अधीनतेने यासंबंधात केलेल्या विनियमांद्वारे उपबंधित करता येतील अशा सवलती मिळतील.
(४) मंडळातील कोणतेही पद रिक्त असण्याच्या किंवा मंडळाच्या घटनेत दोष असण्याच्या केवळ कारणावरून केलेली कोणतीही कृती किंवा कार्यवाही प्रश्नास्पद ठरणार नाही आणि विशेषत: आणि पूर्वगामी गोष्टीच्या व्यापकतेला बाध न येता कलम ५-क अन्वये मंडळ ज्या कालावधीसाठी पुनर्घटित करण्यात आले असेल त्या कालावधीची समाप्ती व त्या कलमाखाली ज्याची ज्या कालावधीसाठी पुनर्घटना करण्यात आली असेल तो कालावधी या दोहोंमधील अवधीत मंडळाचे पदसिद्ध सदस्य मंडळाच्या सर्व शक्तींचा वापर करील व कामे पार पाडील.)
——-
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ७ द्वारे मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply