प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
प्रकरण २ :
१.(भारताचे प्राणी कल्याण मंडळ) :
कलम ४ :
प्राणी कल्याण मंडळाची स्थापना :
(१) प्राण्यांच्या कल्याणाला सर्वसाधारणत: उत्तेजन देण्यासाठी आणि पशूंना उगीचच होणाऱ्या वेदना व यातना यांपासून त्याचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ, विशेषत: या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, होईल तितक्या लवकर केंद्र सरकारकडून २.(भारताचे प्राणी कल्याण मंडळ) या नावाचे एक मंडळ स्थापन करण्यात येईल.
(२) मंडळ, हा या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने संपत्ती संपादन करण्याच्या, धारण करण्याच्या आणि ती निकालात काढण्याच्या शक्तींसह अखंड परंपरा व सामाईक मोहोर असलेला एक निगमनिकाय असेल आणि त्या नावाने, तो दावा लावील व त्याच्याविरूद्ध दावा लावण्यात येईल.
——–
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ३ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ४ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.