Pca act 1960 कलम ३८ : नियम करण्याची शक्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३८ :
नियम करण्याची शक्ती :
(१) केंद्र सरकारला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि पूर्व प्रकाशनाच्या शर्तीच्या अधीनतेने, या अधिनियमान्वये प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करता येतील.
(२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तींच्या व्यापकतेस बाध न येता केंद्र सरकार, पुढील सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबींसाठी नियम करू शकेल, त्या बाबी खालीलप्रमाणे –
(a)(क)(अ) मंडळाच्या सदस्यांच्या १.(***) सेवाशर्ती, त्यांना देय असणारे भत्ते आणि ज्या रीतीने ते आपल्या शक्तीचा वापर करू शकतील आणि आपली कामे पार पाडू शकतील, ती रीत;
(aa)२.(कक)(अअ) कलम ५ च्या पोटकलम (१) च्या खंड (ङ) अन्वये ज्या रीतीने महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्याकरिता व्यक्तीला निवडून देता येईल, ती रीत;)
(b)(ख)(ब) कोणत्याही प्राण्याने वाहून किंवा ओढून न्यावयाचा जास्तीत जास्त भार (यात प्रसंगवशात प्रवाशाच्या वजनाचा कोणताही भार अंतर्भूत आहे;
(c)(ग)(क) प्राण्यांच्या अतिगर्दीला प्रतिबंध करण्याकरिता पाळावयाच्या शर्ती;
(d)(घ)(ड) कोणत्याही वर्गाच्या प्राण्यांचा ज्या कालावधीमध्ये व ज्या तासामध्ये जुंपण्याकरिता उपयोग करता येणार नाही तो कालावधी व ते तास;
(e)(ङ)(इ) प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यासाठी कोणत्याही लगामाचा उपयोग करण्यास किंवा लगामाला जुंपण्यास करावयाचा प्रतिबंध;
(ea)२.(ङक)(इअ) कलम ११ च्या पोटकलम (३) च्या खंड (ख) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे बेवारशी कुत्र्यांचा नाश करण्याच्या अन्य पद्धती;
(eb)(ङख)(इब) ज्याला क्रूरतेशिवाय हलविले जाणे शक्य नसेल अशा कोणत्याही प्राण्याला कलम १३ च्या पोटकलम (३) अन्वये ज्या पद्धतीने नष्ट करता येईल त्या पद्धती;)
(f)(च)(फ) विहित करण्यात येईल अशा प्राधिकरणाने नाल बसवण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला द्यावयाचा परवाना व त्याची करावयाची नोंदणी आणि आकारावयाची फी;
(g)(छ)(ग) विक्री, निर्यात किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी प्राण्यांना पकडताना बाळगावयाची सावधगिरी आणि केवळ या प्रयोजनाकरिता वापरता येणारी उपयंत्रे किंवा साधने आणि अशा रीतीने त्यांना पकडण्यासाठी द्यावयाचे लायसन आणि अशा लायसनकरिता आकारावयाची फी;
(h)(ज) (ह) प्राण्यांचे परिवहन – मग ते रेल्वेने, रस्त्यावरून अंतर्देशीय जलमार्गाने, जहाजाने किंवा विमानाने केलेले असो – करीत असताना बाळगावयाची सावधगिरी आणि ज्या रीतीने व ज्यातून त्यांची असे परिवहन करता येईल तो qपजरा किंवा अन्य पात्र;
(i)(झ)(आय) ज्या वास्तूमध्ये प्राण्यांना ठेवले आहे, जाते किंवा जेथे त्याचे दूध काढले जाते अशा वास्तूच्या मालकाला किंवा प्रभारी व्यक्तीला अशा जागेची नोंदणी करण्यास अशा जागेच्या हद्दीची qभत किंवा अशा वास्तूच्या सभोवतालचा भाग यासंबंधात करण्यात आलेल्या शर्तीचे अनुपालन करण्यास, अधिनियमाखाली जेथे कोणताही अपराध करण्यात आला आहे किंवा करण्यात येत आहे का हे ठरवण्याच्या प्रयोजनार्थ तिचे निरीक्षण करण्याची परवानगी देण्यास आणि अशा जागांमध्ये तेथील लोकांना सामान्यपणे समजू शकेल अशा एका भाषेतील किंवा भाषांतील कलम १२ च्या प्रती प्रदर्शित करण्यास फर्माविणे;
(j)(ञ)(जे) प्रकरण ५ अन्वये ज्या नमुन्यात नोंदणीसाठी अर्ज करता येतील तो नमुना, त्यात समाविष्ट करावयाचा तपशील, अशी नोंदणी करण्यासाठी देय असणारी फी, आणि ज्या प्राधिकरणाकडे असे अर्ज पाठवता येतील ते प्राधिकरण;
(ja)२.(ञक)(जेअ) प्राण्यांवर प्रयोग करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांची नोंदणी करण्याकरिता किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाकरिता कलम १५ अन्वये घटित करण्यात आलेली समिती, आकारू शकेल ती फी;)
(k)(ट)(के) या अधिनियमान्वये ज्या प्रयोजनांसाठी दंडवसुली लागू होऊ शकेल ती प्रयोजने अशा प्रयोजनांमध्ये उपचारगृहे, पांजरपोळ आणि पशुवैद्यकीय अपंगालय यांचे परिरक्षण यांसारख्या प्रयोजनांचा समावेश असेल;
(l)(ठ)(एल) जी विहित करावयाची असेल किंवा विहित करता येऊ शकेल अशी अन्य कोणतीही बाब.
(३) जी कोणतीही व्यक्ती, या कलमाखाली केलेल्या कोणत्याही नियमांचे व्यतिक्रमण करेल किंवा करण्यास अपप्रेरणा देईल तर ती, शंभर रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा तीन महिन्यांपर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.
३.(***)
——-
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १६ द्वारे अटी आणि हे शब्द वगळण्यात आले.
२. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १६ द्वारे मूळ मजकूराऐवजी समाविेट करण्यात आले.
३. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १६ द्वारे पोटकलम (४) वगळण्यात आले.

Leave a Reply