प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३४ :
परीक्षणासाठी अभिग्रहण करण्याची सर्वसाधारण शक्ती :
शिपायाच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला, कोणत्याही प्राण्याच्या संबंधात करण्यात आलेला अपराध हा, या अधिनियमाविरूद्ध केला आहे किंवा केला जात आहे असे मानण्यास कारण असेल तर, तो अधिकारी किंवा ती व्यक्ती, जर परिस्थितीनुसार तसे करणे आवश्यक आहे असे मानण्यास तिला कारण असेल तर, प्राण्याचे अभिग्रहण करू शकेल आणि त्याला नजीकच्या दंडाधिकाऱ्याकडे किंवा विहित करण्यात येईल त्या पशुवैद्यक अधिकाऱ्याकडे परीक्षणाकरिता हजर करू शकेल आणि असा पोलीस अधिकारी किंवा प्राधिकृत व्यक्ती, जेव्हा प्राण्याचे अभिग्रहण करेल तेव्हा त्या प्रभारी व्यक्तीला प्राण्याबरोबर परीक्षणाच्या ठिकाणी जाण्यास फर्मावू शकेल.