Pca act 1960 कलम ३२ : झडती घेण्याच्या किंवा अभिग्रहणाच्या शक्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३२ :
झडती घेण्याच्या किंवा अभिग्रहणाच्या शक्ती :
(१) उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा कोणताही पोलीस अधिकारी किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती जर तिला कलम ३० मध्ये निर्देशिलेल्या अशा कोणत्याही प्राण्याच्या बाबतीत कलम ११, पोटकलम (१) खंड (झ) खालील अपराध कोणत्याही ठिकाणी घडत आहे किंवा अघण्याच्या बेतात आहे किंवा घडलेला आहे असे मानण्यास कारण असेल तर किंवा अशा कोणत्याही प्राण्याची कातडी आणि डोक्याला लागून असलेल्या कातडीचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्तीच्य ताब्यात आहे असे मानण्यास कारण असेल तर असा पोलीस अधिकारी किंवा अशी व्यक्ती ज्या कोणत्याही जागेत अशा प्राण्याची कातडी आहे असे मानण्यात तिला कारण असेल तर अशा कोणत्याही जागेत प्रवेश करू शकेल, आणि त्या जागेची झडती घेऊ शकेल आणि असा अपराध करताना वापरण्यात आलेल्या किंवा तो करण्याच्या उद्देशाने वापरण्यात आलेल्या कातडीचे किंवा वस्तूंचे किंवा गोष्टीचे अभिग्रहण करू शकेल.
(२) उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा कोणताही पोलीस अधिकारी किंवा राज्य शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती जर तिला तिच्या अधिकारितेच्या मर्यादेत, येणाऱ्या कोणत्याही प्राण्यावर १.(कलम १२ मध्ये निर्देशित करण्यात आलेली) फुका किंवा १.(डूमदेव किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची क्रिया) नुकतीच करण्यात आली असल्याचे किंवा ती करीत असल्याचे मानण्यास कारण असेल तर तो अधिकारी किंवा ती व्यक्ती असा प्राणी जेथे आहे असे मानण्यास त्यास कारण असेल अशा कोणत्याही ठिकाणी प्रवेश करू शकेल आणि प्राण्याचे अभिग्रहण करू शकेल आणि ज्या ठिकाणातून प्राण्याचे अभिग्रहण करण्यात आले असेल त्या ठिकाणच्या प्रभारी पशुवैद्यक अधिकाऱ्याकडे प्राणी परीक्षणासाठी हजर करू शकेल.
——-
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १५ द्वारे डूमदेव या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply