प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम २५ :
जागेत प्रवेश करण्याची शक्ती :
(१) कलम २३ मध्ये निर्देशित केलेल्या विहित प्राधिकरणाकडून लेखी प्राधिकृत करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती आणि उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी, –
(a)(क)(अ) ज्या कोणत्याही जागेत खेळ करून दाखवणाऱ्या ज्या कोणत्याही प्राण्यांना प्रशिक्षण दिले जात असेल किंवा ज्यांचे प्रदर्शन करण्यात येत असेल किंवा जेथे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा जेथे त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आले असेल अशा कोणत्याही जागेत आणि असे कोणतेही प्राणी जेथे सापडतील अशा कोणत्याही जागी, सर्व वाजवी वेळी, प्रवेश करू शकेल आणि त्या जागेचे निरीक्षण करू शकेल;
(b)(ख)(ब) जी खेळ करून दाखवणाऱ्या प्राण्यांची प्रशिक्षक किंवा प्रदर्शक आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा कोणत्याही व्यक्तीला तिचे नोंदणी प्रमाणपत्र हजर करण्यास तो फर्मावू शकेल;
(२) पोटकलम (१) मध्ये निर्देशित केलेली कोणतीही व्यक्ती किंवा पोलीस अधिकारी, या कलमाखाली खेळ करणाऱ्या प्राण्यांचा सार्वजनिक ठिकाणी खेळ सुरू असताना मंचावर किंवा मंचाच्या मागे जाण्यास हक्कदार असणार नाही.