Pca act 1960 कलम २४ : खेळ करणाऱ्या प्राण्यांचे प्रदर्शन व प्रशिक्षण याला मनाई करण्याची किंवा त्यावर निर्बंध घालण्याची न्यायालयाची शक्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम २४ :
खेळ करणाऱ्या प्राण्यांचे प्रदर्शन व प्रशिक्षण याला मनाई करण्याची किंवा त्यावर निर्बंध घालण्याची न्यायालयाची शक्ती :
(१) पोलीस अधिकाऱ्याने किंवा कलम २३ मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे विहित प्राधिकरणाकडून लेखी प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीवरून, खेळ करणाऱ्या कोणत्याही प्राण्याला उगीचच वेदना किंवा यातना देऊन प्रशिक्षण दिले जात आहे किंवा प्रदर्शन केले जात आहे आणि तसे करण्यास मनाई करणे किंवा केवळ शर्तींच्या अधीनतेने तसे करण्यास परवानगी देणे आवश्यक असल्याविषयी त्याची खात्री पटेल त्याबाबतीत न्यायालय, ज्या व्यक्तीच्याबाबतीत तक्रार करण्यात आलेली असेल त्या व्यक्तीविरूद्ध प्रशिक्षण देण्यास किंवा त्यांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्याशी किंवा त्यासंबंधात आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्ती घालण्याशी संबंधित आदेश करू शकेल.
(२) या कलमान्वये ज्या कोणत्याही न्यायालयाकडून आदेश देण्यात आला असेल ते न्यायालय, आदेश दिल्यानंतर होईल तितक्या लवकर आदेशाची पाठवावयाची एक प्रत, जिच्याविरूद्ध आदेश देण्यात आला आहे, त्या व्यक्तीची नोंदणी ज्याच्याकडून झाली असेल त्या विहित प्राधिकरणाकडे पाठवण्याची आणि त्या व्यक्तीने धारण केलेल्या प्रमाणपत्रावर आदेशाचा तपशील पृष्ठांकित करण्याची व्यवस्था करील आणि पृष्ठांकनाच्या प्रयोजनार्थ, न्यायालय तसे करण्यास फर्मावील तेव्हा ती व्यक्ती आपले प्रमाणपत्र सादर करील आणि या कलमान्वये ज्या विहित प्राधिकरणाकडे आदेशाची एक प्रत पाठवण्यात आली आहे ते प्राधिकरण त्या नोंदवहीत आदेशाच्या तपशिलाची नोंद घेईल.

Leave a Reply