प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
प्रकरण ५ :
खेळ करणारे प्राणी :
कलम २१ :
प्रदर्शित करणे व प्रशिक्षण देणे यांच्या व्याख्या :
या प्रकरणामध्ये प्रदर्शित करणे याचा अर्थ, जेथे लोकांना तिकीट विक्रीमार्फत प्रवेश देण्यात येतो अशा कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमात प्रदर्शित करणे असा आहे आणि प्रशिक्षण देणे याचा अर्थ, अशा कोणत्याही प्रदर्शनासाठी प्रशिक्षण देणे, असा आहे आणि प्रदर्शक व प्रशिक्षक या शब्दप्रयोगाचे अनुक्रमे तत्सम अर्थ असतील.