पारपत्र अधिनियम १९६७
कलम १९ :
पासपोर्ट आणि प्रवासपत्रे विवक्षित देशांचा प्रवास करण्याच्या प्रयोजनार्थ विधिबाह्य असणे :
एखादा परकीय देश हा, –
(a)(क)(अ) भारतावर आक्रमण करणारा असा देश आहे; किंवा
(b)(ख)(ब) भारतावर आक्रमण करणाऱ्या देशाला साहाय्य करणारा असा देश आहे; किंवा
(c)(ग) (क)जेथे सशस्त्र रणसंग्राम चालू आहे असा देश आहे; किंवा
(d)(घ) (ड)ज्या देशाच्या प्रवासामुळे भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार चालविण्याच्या कामी गंभीर हानी पोहोचेल अशी परिस्थिती असल्याकारणाने त्या देशामध्ये प्रवास करण्यावर निर्बंध घातले पाहिजेत असा देश आहे, –
अशी अधिसूचना केंद्र शासनाने काढली तर, अशा देशामधून प्रवास करण्यासाठी किंवा अशा देशाला भेट देण्यासाठी दिलेला पासपोर्ट किंवा प्रवासपत्र अशा प्रवासाच्या किंवा भेटीच्या प्रयोजनार्थ विधिग्राह्य राहणार नाही; मात्र एखाद्या बाबतीत विहित प्राधिकरणाने विहित नमुन्यामध्ये त्यावर खास पृष्ठांकन करून दिले असेल तर गोष्ट अलाहिदा (वेगळी).
