Nsa act 1980 कलम १८ : निरसन व व्यावृत्ती :

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम १८ :
निरसन व व्यावृत्ती :
१) राष्ट्रीय सुरक्षा अध्यादेश, १९८० (१९८० चा ११) याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
२) असे निरसन करण्यात आले असले तरी, उक्त अध्यादेशान्वये करण्यात आलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही हा अधिनियम २३ सप्टेंबर १९८० रोजी अमलात आला असल्याचे समजून या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींअन्वये करण्यात आली असल्याचे समजण्यात येईल आणि विशेषत: उक्त अध्यादेशाच्या कलम १० अन्वये करण्यात आलेल्या आणि या अधिनियमाला राष्ट्रपींची अनुमती मिळाल्याच्या दिनांकाच्या लगतपूर्वी कोणत्याही सल्लागार मंडळापुढे प्रलंबित असलेल्या कोणत्याही निर्देशावर असे मंडळ जणूकाही या अधिनियमाच्या कलम ९ अन्वये स्थापन झाले आहे असे समजून ते मंडळ त्या दिनांकानंतर विचार करणे चालू ठेवू शकेल.

Leave a Reply