राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम १२ :
सल्लागार मंडळाच्या अहवालावरील कार्यवाही :
(१) एखाद्या व्यक्तीच्या स्थानबद्धतेसाठी आपल्या मते पुरेसे कारण आहे असा अहवाल सल्लागार मंडळाने दिला असेल अशा कोणत्याही प्रकरणी, समुचित शासनाला स्थानबद्धता आदेश कायम करता येईल आणि त्यास योग्य वाटेल अशा कालावधीपर्यंत संबंधित व्यक्तीची स्थानबद्धता चालू ठेवता येईल.
(२) एखाद्या व्यक्तीच्या स्थानबद्धतेसाठी आपल्या मते पुरेसे कारण नाही असा अहवाल सल्लागार मंडळाने दिला असेल अशा कोणत्याही प्रकरणी समुचित शासन तो स्थानबद्धता आदेश रद्द करील आणि संबंधित व्यक्तीला तत्काळ मुक्त करण्याची व्यवस्था करील.