Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ८ : विवक्षित कामांना मनाई :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
प्रकरण ३ :
मनाई, नियंत्रण व विनियमन :
कलम ८ :
विवक्षित कामांना मनाई :
कोणतीही व्यक्ती, वैद्यकीय किंवा शास्त्रीय प्रयोजनांकरीता असेल आणि हा अधिनियम किंवा त्याखाली केलेले नियम वा विनियम यांच्या तरतुदींद्वारे तरतूद केलेल्या रीतीने व मर्यादेपर्यंत असेल त्या बाबतीत अशा लायसन्सच्या परवान्याच्या किंवा प्राधिकारपत्राच्या अटी व शर्तींनुसार असेल. त्यावतिरिक्त इतर बाबतीत-
अ) कोणत्याही कोका वनस्पतीची लागवड करणार नाही किंवा कोका वनस्पतीचा कोणत्याही भाग गोळा करणार नाही; किंवा
ब) अफूच्या झाडाची किंवा कोणत्याही कॅनॅबिस वनस्पतीची लागवड करणार नाही;किंवा
क) कोणत्याही गुंगीकारक औषधी द्रव्याचे किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांचे उत्पादन काढणार नाही, त्यांची निर्मिती करणार नाही, ते कब्जात ठेवणार नाही. त्यांची व्रिकी करणार नाही, ते खरेदी करणार नाही, वखारीत ठेवणार नाही, वापरणार नाही. त्यांचे सेवन करणार नाही, त्यांची आंतरराष्ट्रीय आयात करणार नाही. आंतरराज्यीय निर्यात करणार नाही, भारतात आयात करणार नाही, भारतातून निर्यात करणार नाही किंवा ते एका वाहनातून दुसऱ्या वाहनात चढवणार नाही.
परंतु या अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या अधीन राहून वैद्यकीय व शास्त्रीय प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनांकरिता गांजाचे उत्पादन काढण्याकरिता कॅनॅबिस वनस्पतीची लागवड करण्यास किंवा गांजाचे उत्पादन, कब्जा, वापर, सेवन, खरेदी, विक्री, वाहतूक, वखारीत साठवणे, आंतरराज्यीय आयात आणि निर्यात करण्यास केलेली मनाई ही केंद्र सरकार या संबंधात, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नमूद करील अशा दिनांकापासूनच अमलात येईल.
१.(परंतु आणखी असे की, सजावटीच्या प्रयोजनाकरिता केल्या जाणाऱ्या, अफूच्या गवतांच्या निर्यातीला या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.)
———
१. १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version